Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजचे सदानंद भोपळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या प्रभारी कार्यकारी अभियंतापदी



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील पंतप्रधान पुरस्कार विजेते सदानंद काशिनाथ भोपळे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून बदली झाली आहे. कराड येथे त्यांनी ही जबाबदारी स्विकारली.




अत्यंत हालाखीच्या स्थितीतून शिक्षण पुर्ण करून गेली तीस वर्षे विविध ठिकाणी त्यांनी अभियंता म्हणून छाप पाडली आहे. यात कर्जत, कणकवली, दापोली, वाई येथील नगरपालिकांचा समावेश आहे. देशातील पहिलीच चोवीस तास पिण्याचे पाणी योजना मलकापूर पालिकेत यशस्वी केल्याने त्यांचा पंतप्रधान पुरस्कार देऊन केंद्र शासनाने गौरव केला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यालयात तर माध्यमिक शिक्षण एम. आर. हायस्कूल येथे झाले आहे. गारगोटीच्या आयसीआरईमधून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.