Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साधना हायस्कूलमध्ये नवागतांचे जल्लोषात स्वागत

पाठ्यपुस्तकांचे वाटप ; पावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह 




गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) : आज येथील साधना हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे  पत्रकार महादेव तुरंबेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी पावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला.




शालेय प्रार्थना व परिपाठानंतर नवागत विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत केल्यानंतर नवागत विद्यार्थी आनंदी व उत्साही झाले. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांना पत्रकार श्री. तुरंबेकर यांच्या हस्ते तसेच अन्य शिक्षकांच्या हस्ते पुस्तके वाटप केली. पुस्तक वाटपानंतर विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले.



प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी प्रास्ताविकामध्ये प्रशालेची माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. वर्षभराचे थोडक्यात नियोजन सांगून शिस्तबद्ध व अभ्यासू जीवनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी संस्था सचिव जे. बी. बारदेस्कर, पर्यवेक्षक ए. जे. बारदेस्कर, संचालिका सौ. फिलॉन बारदेस्कर, सर्व शिक्षक -शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बहुसंख्य विद्यार्थी व पालक पहिला दिवस असल्याने आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कांबळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.