Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला नागरिक मंचकडून 'मॉर्निंग फुटपाथ वॉक'

फूटपाथवर चालताना निर्माण होणाऱ्या अडचणी, अतिक्रमणांची घेतली माहिती


अपघातमुक्त व सुरक्षित मॉर्निंग वॉकसाठी मंचची जनजागृती



                                                छायाचित्र : मज्जीद किल्लेदार

गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील 'नागरिक मंच'कडून 'मॉर्निंग फुटपाथ वॉक' करण्यात आले. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे वाढलेल्या भरधाव वाहतूकीने रस्त्याच्या बाजूने मॉर्निंग वॉक व पादचाऱ्यांना चालणे देखील धोक्याचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच पोलीस व पालिका प्रशासनाने अतिक्रमणमुक्त केलेल्या फूटपाथवरून चालताना काही ठिकाणी अजूनही येणाऱ्या अडचणी पाहण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.



सकाळी ७ वाजता नगरपालिकेपासून  मार्केट यार्ड ते संकेश्वर रोडपर्यंत हे फूटपाथ वॉक करण्यात आले. यावेळी फूटपाथवर चालताना येणाऱ्या अडचणी, काही ठिकाणी फुटपाथवर झालेले अतिक्रमण आदी बाबी समजून घेण्यात आल्या. याबाबत नागरिक मंच कडून संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून यावर उपाययोजना कराव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.



यामध्ये नागरिक मंचचे अध्यक्ष बाबासाहेब आजरी, मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, डॉ. एम. एस. बेळगुद्री, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, डॉ. सुप्रिया रुद्रापगोळ,सुनील चव्हाण, दयानंद खन्ना, राजू तेलवेकर, प्रशांत बाटे, संदीप कागवाडे, अनिल बिरंजे, डॉ. विजय रुद्रापगोळ, रामकुमार सावंत, बाळासाहेब पोतदार, यशवंत यमगेकर, विजय यमगेकर, रफिक पटेल यांच्यासह इतर सहभागी झाले होते.











Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.