Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमधून पडून पाच जणांचा मृत्यू ; अनेक जण जखमी

दिवा- मुंब्रा स्थानकांदरम्यानची घटना



मुंबई :
एकमेकांना ओलांडणाऱ्या दोन  लोकल ट्रेनमधून पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली असून या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, एक ट्रेन कसाराकडे जात होती तर दुसरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत होती.  एकमेकांना ओलांडणाऱ्या गाड्यांच्या फूटबोर्डवरून प्रवास करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते रेल्वे रुळांवर पडले. कसाराला जाणाऱ्या ट्रेनच्या गार्डने रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. यानंतर अधिकारी आणि पोलिस कर्मचारी रुग्णवाहिकांसह घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना बाहेर काढले. त्यांना कळवा येथील रुग्णालयात नेण्यात आले जिथे पाच जणांना मृत घोषित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.