Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माहेरी आलेल्या नवविवाहितेवर चंदनकुड येथे हल्ला ; हलकर्णी परिसरात खळबळ



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हळद काढण्यासाठी माहेरी आलेल्या नवविवाहितेवर अज्ञाताने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गडहिंग्लज तालुक्यातील चंदनकुड  येथे शनिवारी रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे. जखमी सौ. निलावती रामचंद्र व्हसकोटी (वय २९) यांच्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.



 याबाबतची अधिक माहिती अशी की, आठवडापूर्वीच निलावतीचे लग्न झाले आहे. शनिवारी हळद काढण्यासाठी चंदनकुड (व्हसकोटी मळा) येथे त्या आल्या होत्या. दरम्यान त्यांच्या घरासमोरील गोठ्याजवळ अज्ञाताने लोखंडी रॉडने डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात निलावती ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नरेवाडी येथील संगोपन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. एका नवविवाहितेवर अशाप्रकारे हल्ला झाल्याने हलकर्णी परिसरात खळबळ उडाली असून नेमका हा हल्ला कशामुळे झाला याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय घाटगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण देसाई करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.