Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चॉकलेटचे अमिष दाखवून बालिकांशी गैरवर्तन ; खमलेहट्टीतील एकास अटक



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चॉकलेटचे अमिष दाखवून बालिकांशी अश्लील गैरवर्तन करणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील खमलेहट्टी येथील प्रल्हाद जानबा खैरे (वय ५५) याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.


याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, खमलेहट्टी येथील प्रल्हाद खैरे हा गवंडी काम करतो. तो विवाहित असून त्याला दोन मुली व एक मुलगा आहे. शनिवार दिनांक ७ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास प्रल्हाद याने यातील पीडित मुलींना तंबाखू व चॉकलेट आणण्यासाठी दुकानाला पाठवले होते. मुलींनी ते आणून दिल्यानंतर त्याने त्यांना घरात घेत त्यांच्याशी गैरवर्तन केले. याबाबत घरी आई-वडिलांना सांगू नका ते तुम्हाला मारतील अशी भीती देखील त्याने या मुलींना घातली. सदर प्रकार मुलींकडून समजल्यानंतर पीडित मुलीच्या आईने याबाबतची तक्रार गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. नातवंडासमान असणाऱ्या मुलींशी प्रल्हाद याने गैरवर्तन केल्याने गडहिंग्लज तालुक्यात संताप व्यक्त होत असून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.