गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील मुस्लिम सुन्नत जमात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली.सकाळी ईदगा मैदानात सामुदायिक नमाज पठण करण्यात आले.
यावेळी ईद-उल अधाह तथा बकरी ईद सणाचे महत्त्व हाफिज मोहम्मद मकानदार यांनी सांगितले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय घाटगे, विजयकुमार पाटील, जमात अध्यक्ष, अलीसो कादरभाई, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, आलीम मोहम्मद अन्सार, शकील पट्टणकुडी, हाजी लायकली मालदार, गैबू कोणकेरी, अल्ताफ मुल्ला, इस्माईल यमकनमडी, नूर मकानदार, अयाज बागवान, राजू खलिफा, गुंडू तब्बलजी, नजीर कादरभाई, सादीक नगारसे, मीरा पानारी, असगरअली बागवान, बाबासाहेब मकानदार, इस्माईल कादरभाई, गुंडू तब्बलजी इम्तियाज मुल्ला, मलिक कादरभाई, फिरोज ताशिलदार, अमानुला मालदार यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.jpg)
.jpg)