Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नांगनूरमध्ये सेवानिवृत्त पोलिसाच्या घरात चोरी ; १५ तोळे दागिने, वीस हजाराची रोकड लंपास



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर येथे सेवानिवृत्त पोलिसाच्या घरातील सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याने खळबळ उडाली आहे. याची नोंद गडहिंग्लज पोलिसात झाली असून पोलिसांनी गतीने तपास सुरू केला आहे. 



याबाबत अधिक माहिती अशी की नांगनूर येथील नाना निंगाप्पा बामणे हे मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. वास्तव्याला देखील ते मुंबईतच असतात. सध्याच गावाकडे त्यांनी ग्रामपंचायतीसमोर नवीन घर बांधले आहे. यात्रेनिमित्त मे महिन्यात पत्नीसह ते गावी आले होते. दरम्यान सोमवारी हर्नियाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी ते एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे घरी कोणीच नव्हते. याचीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीतील लोखंडी गज उचकटून घरात प्रवेश केला. घरातील तिजोरीत ठेवलेले १५ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व वीस हजाराची रोकड पळविली. मंगळवारी सकाळी घराशेजारील नागरिकांना बामणे यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज उचकटलेले दिसल्याने शंका आली. त्यांनी बामणे यांच्या पत्नी नंदा यांना याची माहिती दिल्यानंतर त्याने घराकडे धाव घेत दरवाजा उघडून पाहिल्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले.



घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, उपनिरीक्षक विजय घाटगे यांनी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले. कोल्हापूरहून श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.