Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मनवाड, तेरणी मार्गे गडहिंग्लज-हत्तरगी व गडहिंग्लज- मुंबई बस सुरू करा !

भाजपच्या वतीने गडहिंग्लज आगारप्रमुखांना निवेदन





गडहिंग्लज (प्रतिनिधी): मनवाड, तेरणी मार्गे हत्तरगी तसेच मुंबई पर्यंत एसटी बस सुरू करावी अशी मागणी भाजपच्या वतीने गडहिंग्लज बसस्थानकाचे व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन भाजपाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.



तेरणी हे गाव महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागात आहे. येथील ग्रामस्थांचे दैनंदिन दळणवळण हे गडहिंग्लज तालुका तसेच कर्नाटक राज्यातील हत्तरगी, यमकनमर्डी या गावाकडे होत असते. तसेच विद्यार्थ्यांना देखील विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी या परिसरात जावे लागते. तेरणी पंचक्रोशीतील बहुतांशी चाकरमानी हे मुंबई येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. त्यांचा नियमित संपर्क गावाशी येत असतो. त्यामुळे मनवाड, तेरणी, यमकनमर्डी मार्गे गडहिंग्लज हत्तरगी व मनवाड मार्गे तेरणी-मुंबई अशा एसटी बसेस सुरू कराव्यात अशी मागणी या निवेदनातून केली आहे.



निवेदनावर प्रीतम कापसे, अनिल गायकवाड, सुधाकर गोरुले, रामचंद्र कांबळे, दीपक लोखंडे, सतीश हळदकर, सचिन घुगरे, माधव पोटे पाटील आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.