Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शासनाकडून सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती अदा



कोल्हापूर : सन 2024-25 या आर्थिक वर्षातील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यासाठी शासनाकडून 20 मे 2025 च्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेला निधी दिनांक 12 जून 2025 रोजी सारथी उपकेंद्र कोल्हापूर कार्यालयास प्राप्त झाला असून त्यामधून एकूण 203 विद्यार्थ्याना 4 कोटी 13 लाख 47 हजार 144 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील अधिछात्रवृत्ती तसेच दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील घरभाडे रक्कम व आकस्मिक खर्चाच्या रकमेचा समावेश आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एकाही विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती रक्कम या कार्यालयाकडून प्रलंबित नाही. अशी माहिती कोल्हापूर सारथी उपकेंद्राच्या सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.


मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजामधून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या माध्यमाने विशेष प्रोत्साहन देण्यासाठी "छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजना" सारथीमार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सारथी उपकेंद्र कोल्हापूर अधिनस्त चार विद्यापीठांमधून 2019 ते 2023 पर्यंत एकूण 427 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पाच वर्षाकरिता शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या दोन वर्षांसाठी दरमहा 37 हजार तर पुढील 3 वर्षांसाठी दरमहा 42 हजार अधिछात्रवृत्ती रक्कम देण्यात येते. तसेच त्यांना शासन नियमानुसार घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च देण्यात येतो असेही पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.