छायाचित्र : मज्जिद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने त्याग आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाणारे 'ईद-उल अजाह' अर्थात बकरी ईद गडहिंग्लज येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी वडरगे रोडवरील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मौलाना मेहमूद रजा यांनी नमाज पठण व खुतबा पठण केले. याप्रसंगी मानवी मूल्यांचे जतन व्हावे, समस्त मानव जातीचे कल्याण व्हावे, सुख-समृद्धी तसेच एकता व बंधुता कायम टिकून राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
नमाज नंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. आभार रफिक पटेल यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रेसिडेंट मन्सूरभाई मकानदार, इर्षाद मकानदार, ताहीर कोचरगी, रफिक पटेल, अल्ताफ शानेदिवाण, परवेज शेख, नूर अत्तार, गौस मकानदार, फिरोज मणेर, जाविद खलिफ यांनी केले.


