Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज बसस्थानक परिसरातील बेकायदेशीर खोकी हटवा!

शिंदे शिवसेनेचे शहर संघटक काशिनाथ गडकरी यांची मागणी


पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज बसस्थानक परिसरात नगरपालिकेच्या हद्दीत ठिकठिकाणी बेकायदेशीर खोकी उभी केली आहेत. याच ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची तक्रारी येत आहेत, त्यामुळे चौकशी करून हे बेकायदेशीर खोकी हटवावित अशी मागणी शिंदे शिवसेनेचे शहर संघटक काशिनाथ गडकरी यांनी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.


बेकादेशीर खोकी टाकल्याने वाहतूकीसाठी अडचणी निर्माण होत आहे. या मार्गावरील शाळकरी मुलांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने नेहमी वर्दळ असते. अशा ठिकाणी बेकादेशीर खोकी उभी केल्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता अधिक असून पालिका प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करुन बेकायदेशीर खोकी तातडीन काढावीत, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. यावेळी काशिनाथ गडकरी, सागर कांबळे, लक्ष्मण पाच्छापूरे, अरूण नेर्लीकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.