जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्री.संत सद्गुरू बाळुमामा देवस्थान आदमापुरच्या देवस्थान कमिटी अध्यक्षपदी गडहिंग्लज तालुक्यातील जरळीचे माजी सैनिक लक्ष्मण होडगे यांची निवड झाल्याबद्दल आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
तब्बल २७ वर्षे सेवा व संघर्षानंतर यांची निवड झाली आहे. यावेळी आजी-माजी सैनिक तालुका जय जवान जय किसान फौंडेशन गडहिंग्लजचे सल्लागार सुबराव पाटील, जयवंत नगरे, सदस्य व हरळी खुर्दचे उपसरपंच शशिकांत चौगुले, धनाजी चव्हाण, महादेव घुगरे, अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते.

.jpg)