श्वेता कांबळे हिच्या शिक्षणासाठी दिले प्रोत्साहन
आजरा : उत्तूर विद्यालय येथील श्वेता मारुती कांबळे या विद्यार्थिनीने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 264 गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात 13वा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल युवासेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तीचा सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. श्वेताने घरची परिस्थिती प्रतिकूल असताना देखील मोठ्या जिद्दीने परिश्रम घेत मिळवलेल्या यशाचे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
यावेळी युवा सेनेचे आजरा तालुकाप्रमुख रोहित डावरे, उप तालुकाप्रमुख सचिन पाटील, सरचिटणीस शकील मुल्ला, उत्तूर शहर प्रमुख संतोष कांबळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी युवासेना सदैव तत्पर असून विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही सरचिटणीस शकील मुल्ला यांनी यावेळी दिली.

