Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुत्नाळ येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदी प्रतिक कलाज व कोमल चिगरी



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुत्नाळ येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये  सन 2025 - 26 या शैक्षणिक वर्षासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी व मतदानाबाबत जागृती व्हावी या उद्देशाने जिमखाना विभागामार्फत मतदान प्रक्रिया पार पडली.



शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदी  प्रतिक बसाप्पा कलाज व विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी कोमल संजय चिगरी यांची निवड झाली. युवराज बाकळे, शिवानी गवळी, प्रेम कल्याणी, रोहिणी बेळवी, शिवलिंग कोणुरे, श्रावणी चिनगी, अथर्व हट्टी, सानवी जरळी, श्रेयस टोणपी, सलोनी गिजवणे, संग्राम नाईक, सृष्टी घस्ती, साईनाथ नवलाज, स्नेहल घस्ती, भूषण बेळेवारी, वर्षा पाटील, शुभम पाटील, राधिका पाटील, आरमान मुल्ला, मुस्कान खलिफ, समर्थ पाटील, प्रतिक्षा भेंडीगिरी या विद्यार्थ्यांची वर्ग प्रतिनिधी म्हणून निवड झाली.



प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी अनावरे,उपमुख्याध्यापक बी.जी.कुंभार, वैशाली कागवाडे, कल्पना पाटील, राजेंद्र पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिमखाना विभागप्रमुख बाळासाहेब खरात व सर्व शिक्षक यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.