Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्या मंदिर तेगिनहाळसाठी शनिवार ठरला आनंददायी शनिवार

गडहिंग्लजच्या रमणलाल मनियार स्मृती फाउंडेशनमार्फत सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप




गडहिंग्लज (प्रतिनिधी): रमणलाल मनियार स्मृती फाउंडेशन, गडहिंग्लज मार्फत आज कुमार विद्या मंदिर, तेगिनहाळ शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.



अतिशय उपयुक्त व टिकाऊ शैक्षणिक साहित्यमध्ये स्कूल बॅग, टिफीन, वह्या, पेन्सिल, चित्रकला वही व कलर बॉक्स मोफत वाटप करण्यात आले. सदर साहित्य फाऊंडेशनच्या राहुल मणियार, सुमित मणियार व श्री. हेमंत करीगार यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी बाळासाहेब वालीकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.



कार्यक्रमाला सरपंच शेखर बाडकर, उपसरपंच मनोज जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे रविदादा कांबळे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अयाज बागवान यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.