Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्वामी कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी अखंडित जपली : सरपंच मलिकार्जुन आरबोळे

मुगळी विद्यामंदिर शाळेत स्वामी गुरुजींच्या 103 व्या जयंती निमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप





गडहिंग्लज (प्रतिनिधी): आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो याच हेतूने गेली 43 वर्षे मुगळी येथील स्वामी कुटुंबीयांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप होत आहे. त्यांच्याकडून जपली जाणारी अखंडित सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांनी केले.


मुगळी येथील विद्यामंदिर शाळेत स्वामी गुरुजींच्या 103 व्या जयंती निमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन पुंडलिक आरबोळे होते. स्वागत सुरेश यादव यांनी केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी कै गुरलिंगया स्वामी यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व  खाऊ वाटप करण्यात आले.


गुरलिंगया स्वामी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या पेन्शनमधून काही रक्कम बँकेत ठेवली होती. त्यांचा मुलगा निजगुणी स्वामी यांनी आपल्या केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्तीनंतर काही रक्कम ठेव ठेवली व आता पुढे मुलगा श्रीपाद स्वामी यांनीही रक्कम बँकेत ठेव म्हणून ठेवली असून या ठेवीच्या व्याजातून स्वामी कुटुंबियाकडून 1982 पासून गुरलिंगया स्वामी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.



या कार्यक्रमास माजी उपसरपंच सरपंच संतोष भोसले  निजगुणी स्वामी बी जी स्वामी, किशोर मुसळे, सुरेश यादव, महादेवी यादव, अनिता पाटील, सरीता घोटणे, अनिता शिंदे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते.महादेवी यादव यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.