विद्यार्थिनीनी रेखाटल्या आकर्षक रांगोळ्या
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद् घाटन शिक्षक रमण लोहार आणि आर. एल. पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्या प्रा. वैशाली भिऊंगडे होत्या.
विद्यार्थिनीनी विविध विषयावर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या. सर्व रांगोळ्याना दाद मिळाली. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण रमण लोहार यांनी केले. सांस्कृतिक विभागप्रमुख अनुजा पाटील यांनी संयोजन केले. यावेळी प्रा. विवेक इंगळे, प्रा. प्रियांका आजरी, प्रा. प्रतिभा फुंडे , प्रा. अपर्णा पाटील, प्रा. सुमैया मुल्ला, प्रा. नम्रता जाधव, प्रा. वंदना कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थापक सचिव जे. बी. बारदेस्कर यांची प्रेरणा मिळाली.


