गडहिंग्लज (प्रतिनिधी): लोकशाहीचे महत्त्वाचे अंग म्हणजे निवडणूक. या निवडणूक प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित व्हावे या उद्देशाने आज वि. मं. खणदाळ शाळेत शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक संपन्न झाली.
मुख्यमंत्री निवडण्यासाठी EVM Voter या app चा वापर करण्यात आला, तर उर्वरित मंत्रिपदासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला. या निवडणूकीसाठी ४ थी ते ७वी च्या विद्यार्थांनी भाग घेतला. मुख्याध्यापक श्रीकांत पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लिकार्जुन यादगुडी, रेखा नाईक, राजश्री मग दूम,मारूती कोलुनकर, वत्सला पाटील, अमित चव्हाण, सुधा हुली आदींनी काम पाहिले. निवडणूक अधिकारी म्हणून सातवीच्या मुलींनी उत्कृष्ठपणे कर्तव्य बजावले.
शालेय मंत्रिमंडळ असे : मुख्यमंत्री - समर्थ चिरमुरे
इतर मंत्री पुढीलप्रमाणे - प्राजक्ता दळवाई, सार्थक घोडके, पृथ्वीराज कोणरी, कार्तिक मगदूम, श्रेया पाटील, सोहमराजे कोटगी, संकल्प मांग, श्रेयस जाधव, दिव्यांका कोणूरी, मानव जाधव, करण चिरमुरे, श्रावणी यरकदावर, श्रद्धा मोकाशी, रोहित बिरंजे.


