गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील श्री संत बाळुमामा मंदिरात आज आषाढी एकादशीला श्री सुरगीश्वर मठ कसबा नूलचे मठाधिपती षट्स्थळब्रम्ही श्री परम पूज्य गुरुसिध्देश्वर महास्वामीजींच्या अमृतहस्ते आणि दिव्य सानिध्यात श्री विठ्ठल रखुमाईस महाअभिषेक व महापुजा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष रमेश रिंगणे, उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, सचिव चंद्रकांत सावंत यांची उपस्थिती होती.
यावेळी ज्येष्ठ पंच आप्पासाहेब बस्ताडे, रावसाहेब कुरबेट्टी, राजू पोवळ, बसवराज आजरी, प्रकाश भमानगोळ, बाळासाहेब सुतार, राजशेखर यरटे, संदिप रिंगणे, महेश तुरबतमठ, शिवाजीराव पाटील जरळीकर, बाळुमामा काडापुरे, राजेंद्र भांडेकर, सहदेव काडापुरे इत्यादी मान्यवरांसह भक्तगण उपस्थित होते.
"पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी वीस तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पण इथे वीस सेकंदात देवदर्शन होते. हे तुम्हा सर्व भक्तांचे भाग्य आहे. श्री संत बाळु मंदिर मामा देवस्थान सेवा संस्थानचे कार्य आणि सेवा प्रशंसनीय असल्याचे सांगून स्वामीजींच्या आशिर्वचन महाप्रसादाने व स्वामीजीना पवित्र महावस्रार्पणाने कार्यक्रमाची सांगता झाली.


