Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य गडहिंग्लजला आज रक्तदान शिबीर

बहुसंख्येने रक्तदान करण्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे यांचे आवाहन 


सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत राधाकृष्ण मंदिर, आजरा रोड येथे आयोजन




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका भाजपा पक्षाची काल कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष, यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आज दिनांक २२ जुलै रोजी सकाळी ९.०० ते सायं. ४.०० पर्यंत राधाकृष्ण मंदिर, आजरा रोड, गडहिंग्लज येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे ठरविले असून या शिबीरामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन भाजपचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे यांनी केले आहे.


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देव, देश, धर्माच्या हितासाठी घेतलेले निर्णय, १२ गड किल्यांचा युनिस्को वारसा यादीत समावेश, लाडक्या बहिणींसाठी घेतलेला निर्णय, शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेला निर्णय, गायींना राजमाता दर्जादेणेचा निर्णय, विशाळगडावरील अतिक्रमण हटविणे, गणेशोत्सव  राज्य उत्सव म्हणून सजरा करण्याचा घेतलेला निणर्य अशा विविध कल्याकाणरी उपक्रमांची कृतज्ञता व शुभेच्छा रक्तदान करुन देण्याचे ठरविण्यात आले.


या बैठकीस प्रितम कापसे, राजेंद्र तारळे, अनिता चौगुले, अनिल गायकवाड, विक्रम पवार, अमित पाटील, सुधाकर गोरुले, अमोल तांबेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.