Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले वेळेत द्या ; अन्यथा आंदोलन

गडहिंग्लजला ठाकरे शिवसेनेने वेधले तहसीलदारांचे लक्ष 


निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची केली मागणी  




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले वेळेत देण्याची मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.




निवेदनात म्हटले आहे की, सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया चालू असून दहावी-बारावी उत्तीर्ण तसेच इतर पदवीधर प्रवेशासाठी लागणारे इ.डब्लु.एस, एस.ई.बी.सी, उत्पन्न दाखला, डोमिसाईल, नॉनक्रिमीलेअर, जातीचे दाखले व डोंगरी दाखले यांची सर्वांत जास्त गरज असते, पण सेवा केंद्रात गेली दोन-चार दिवस सर्व्हर डाऊनमुळे कामकाज ठप्प आहे. आठ दिवस अगोदर मागणी केलेले अर्ज देखील अद्याप मिळालेले नाहीत. काही शैक्षणिक संस्थांची प्रवेशाची अंतिम मुदत संपली आहे. त्यामुळे दाखले वेळेत न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांशी पत्रव्यवहार करून शैक्षणिक प्रवेश मुदत वाढवण्यासाठी प्रयत्न करावे व तांत्रिक अडचणी निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच आजरा, चंदगड, कागल तालूक्यात जसे 'सेम डे' ला दाखले दिले जातात त्या पद्धतीने गडहिंग्लजमध्येही मिळाले पाहिजेत.  शैक्षणिक दाखले सोडून इतर कामासाठी काही नागरिक उत्पन्न दाखले काढतात त्यांना सर्कल चौकशी लावू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने या निवेदनातून दिला आहे.



निवेदनावर तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, सागर कुराडे, श्रीशैलाप्पा साखरे, मारुती जाधव, संभाजी येडूरकर, तुकाराम वाघराळकर, बाळासाहेब कुंभार, अभिजीत हजारे, मानव रोटे, जयवंत गोरुले, सुरेश हेब्बाळे, सचिन चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.