Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आरटीओ कार्यालयाकडून वाहन चालकांना ऑनलाईन पद्धतीने फेसलेस सुविधा उपलब्ध करुन द्यावी

चंद्रकांत सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्रातून मागणी  




गडहिंग्लज (प्रतिनिधी): प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया प्लॅटफॉर्मद्वारे वाहन चालकांना आणि मालकांना ऑनलाईन पद्धतीने  फेसलेस सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. 



या पत्रात म्हटले आहे की, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामांकरिता  जिल्हा मुख्यालयाच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारणे दुरच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य वाहन धारकांना आणि वाहन चालकांना खूपच त्रासाचे होते. हे खूपच खर्चिक आणि वेळखाऊ असून एजंटांकडून काम करून घ्यायच्या पारंपरिक पद्धतीने फारच गैरसोयीचे आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या " डिजिटल इंडिया" प्लॅटफॉर्म द्वारे "फेसलेस" पध्दतीने ,शासकिय सेवा अल्प खर्चात अत्यंत पारदर्शकपणे आणि कमी वेळात पुरवणे अपेक्षित आहे.


या करिता वाहनांसाठी डुप्लिकेट आर.सी.बुक देणे, परराज्यात वाहन कायमचे नेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, नवीन वाहनांची नोंदणी, वाहन मालकाचे नावात बदल, परराज्यातून आलेल्या वाहनांना महाराष्ट्र राज्याचा नोंदणी क्रमांक देणे, आर.सी.बुकमधील पत्ता बदलणे, एकरकमी वाहन कर भरून घेणे, आंतरराज्य वाहन परवाना अशा सेवा आणि वाहन चालकांसाठी नविन  व डुप्लिकेट वाहन चालक परवाना देणे, त्यावरील पत्ता बदलणे, वाहन चालक परवान्यांचे नुतनीकरण ह्या सर्व सेवा अत्यल्प शासकिय शुल्कात आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकाच्या ओटीपी प्रणालीद्वारे घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने वाहन धारकांना देण्याकरिता ह्या सेवा महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून तात्काळ सुरु करण्यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.