Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गणेश मंडळांनी परवानगी करीता स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा

पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचे आवाहन




कोल्हापूर : सर्व गणेश मंडळांना परवानगी देण्याकरीता पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी योजना कार्यान्वीत करण्यात येणार असून गणेश मंडळानी आवश्यक परवानगी घ्यावी. गणेश मंडळ व पोलीस यांचे समन्वय साधण्याकरीता नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली  आहे. तरी गणेश मंडळांनी परवानगी करीता स्थानिक पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले आहे.


जिल्ह्यात दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते दिनांक 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी विधान भवनात गणेशोत्सव 2025 हा सण महाराष्ट्राचा अधिकृत राज्य महोत्सव म्हणून घोषित केलेला आहे. त्याअनुषंगाने  सर्व गणेश मंडळांनी आगामी गणेश उत्सव सण डॉल्बीमुक्त साजरा करुन पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्यात करावा. सर्व गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम राबवावेत. आगामी गणेश उत्सव सण पारंपरिक पध्दतीने साजरा करण्याकरीता जास्तीत जास्त महिलांना यामध्ये सहभागी करुन घ्यावे, गणेश उत्सव सण पर्यावरण पूरक व डॉल्बीमुक्त गणेश उत्सव म्हणून साजरा करता येईल. दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी गौरी व घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने प्रशासनाचे वतीने ठेवण्यात आलेले विसर्जन कुंड, नदी, विहीर, तलाव या ठिकाणीच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच गौरी पूजनाचे निर्माल्य हे विसर्जन ठिकाणी ठेवण्यात आलेले ट्रॉलीमध्ये ठेवण्यात यावे,


जिल्हा पातळीवर आयोजित करण्यात येणारे स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, गणेश मुर्ती आगमन सोहळयाचे वेळी सर्व गणेश मंडळांनी पांरपारिक वाद्याचा (लेझीम, ढोल, ताशा) वापर करावा, डॉल्बीच्या आवाजाने होणारे दुष्परिणाम टाळता येईल. तसेच गणेश मुर्ती आगमन व विसर्जन मिरवणुक वेळी लेझर लाईटचा वापर होवून नये, याकरीता जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163(1) चे आदेश काढण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.