मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचे पंचायत समितीला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भुदरगड तालुक्यातील आरळगुंडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली भुदरगड पंचायत समितीकडे निवेदनातून केली आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी भुदरगड पंचायत समिती समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तिमाजीनगर आरळगुंडी या गावामधील रस्ता व गटर्स करताना बेकायदेशीर व अनाधिकृतपणे रस्ता रूंदीकरण करण्यासाठी मोडतोड व झाडे पाडून केलेला आहे. लोकांच्या खाजगी मालमत्तेवर खाजगी हक्क असेल आणि बेकायदेशीरपणे मोडतोड झाली असेल, तर ज्यांनी मोडतोड केलेली आहे. सरपंच/ग्रामपंचायत अधिकारी व संबंधित सदस्य यांनी कायदेशीररित्या प्रक्रिया केलेली नाही. उलट अधिकार नसताना लोकांना बेकायदेशीर नोटीसा काढून नोटीसमधून बेकायदेशीर बाबींची प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामाबाबत प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे.
ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावातील काही लोकांनी अधिकार कक्षेबाहेर विषयात लक्ष घालून रस्त्याबाबत बेकायदेशीर नोटीसा देऊन शासनाची व जनतेची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याबाबत आणि बेकायदेशीर रस्ता नोंदीस जबाबदार असणाऱ्यांवर महाराष्ट्र जिल्हा परिषद शिस्त व अपिल नियम- १९६४ मधील नियम ४ नुसार तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ नुसार प्रशासकीय कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ताबडतोब पाठविला पाठवावा. आजपर्यंत केलेल्या तक्रारींवर कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे भुदरगड पंचायत समिती कार्यालयासमोर "बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पारूबाई पाटील, पूजा पाटील, गीता पाटील, सारिका देवेकर, मीना पाटील, बयाबाई पाटील, शकुंतला जाधव, कृष्णा शेटके, रंजना पाटील, हिराबाई पाटील, मारूती अं. पाटील, युवराज पाटील,विनोद देवेकर, सुनिल जाधव, दत्तात्रय पाटील, रोहित पाटील, सौरभ पाटील, राजाराम पाटील, दयानंद पाटील, धनाजी शेटके, मारूती पाटील, दिंगबर विटेकरी, प्रमोद पाटील, राहुल दास, रामचंद्र दास, कृष्णा कांबळे आदी उपस्थित होते.


