Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील 'त्या'अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करू

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश ताशीलदार यांचा इशारा




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील आजरा रोडवरील सिद्धीविनायक अपार्टमेंटमध्ये अनधिकृत बांधकाम करुनही कोकितकर यांच्यावर कारवाई नगरपालिका प्रशासनाने कारवाई केलेली नाही त्यामुळे २५ ऑगस्ट रोजी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश ताशीलदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सिटी सव्र्व्हे नं. १०३/१ अ व ब मध्ये राजेंद्र कोकीतकर यांनी बांधकाम परवान्यापेक्षा अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर नगरपालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे. पण याबाबत टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे तातडीने श्री. कोकीतकर यांच्यावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई करावी, अन्यथा नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा ताशीलदार यांनी दिला आहे. या पत्रकावर संघटनेचे सचिव अशोक बारदेस्कर यांचही सही आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.