Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कवळीकट्टी मार्गावर पहिल्याच दिवशी धावली 'नवी कोरी लालपरी'

गडहिंग्लज - कवळीकट्टी मार्गावर नवी बसफेरी सुरु 


गडहिंग्लज आगारातून सायंकाळी ४. ३० वाजता सुटणार 


विद्यार्थी, प्रवासी व ग्रामस्थांतून आगाराबद्दल समाधान व्यक्त 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज आगाराने सायंकाळी साडेचार वाजता गडहिंग्लज - कवळीकट्टी (बेरडवाडी मार्गे) नवी बसफेरी आजपासून सुरु केली आहे. त्यामुळे तेरणी, कवळीकट्टी येथील विद्यार्थी, प्रवाशी व  ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. कवळीकट्टी येथील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना गडहिंग्लजला येण्यासाठी सकाळी केवळ सव्वा आठ वाजता एकच बस होती, मात्र पुन्हा गावी परत येण्यासाठी बसची सोयच नसल्याने मोठी कुचंबना होत होती. आता ही बसफेरी सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. आगार प्रमुख गुरुनाथ रणे यांच्या कार्यतत्परतेचे प्रवाशांनी कौतुक केले आहे.  

 


आगारातून सायंकाळी साडेचार वाजता सुटणारी गडहिंग्लज - बुगडीकट्टी या बसफेरीचे वेळापत्रक बदलून आगाराने सायंकाळी पाच केल्याने तेरणी, कवळीकट्टी येथील प्रवाशांना पुन्हा अर्धा तास बसची प्रतीक्षा करावी लागत होती. पुढे संत गजानन महाराज अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची देखील गैरसोय होत होती. याबाबत कवळीकट्टीचे सरपंच आनंदा पाटील, तेरणीचे माजी सरपंच करवीर उथळे व संत गजानन शिक्षण समूहाने आगारप्रमुख गुरुनाथ रणे यांचे याबाबत लक्ष वेधले होते. आगारप्रमुख श्री. रणे यांनी ही अडचण लक्षात घेत सायंकाळी साडेचार वाजता या मार्गावर नव्याने गडहिंग्लज- कवळीकट्टी ही बसफेरी आजपासून सुरू केली आहे. त्यामुळे बुगडीकट्टी बसवर पडणारा ताण या बसमुळे कमी होण्यास मदत होणार असून तेरणी, कवळीकट्टीसह या मार्गावरील विद्यार्थी व प्रवाशांची अडचण दूर झाली आहे.



पहिल्याच दिवशी 'नवी कोरी लालपरी'; प्रवाशांचा सुखकर प्रवास 


गडहिंग्लज आगाराने आज पहिल्याच दिवशी या नव्या फेरीचा प्रारंभ नव्या लालपरीनेच केला. बहुतांशी लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणारी ही लालपरी आज या मार्गावर धावल्याने ग्रामीण प्रवाशांना या नव्या लालपरीने सुखकर अनुभव दिला. या मार्गावर नवी गाडी सुरू केल्याने सर्वांनी समाधान तर व्यक्त केलेच मात्र नव्या फेरीला नवी लालपरी दिल्याने त्याहूनही जास्त समाधान प्रवाशांनी व्यक्त केले. दरम्यान, कवळीकट्टीचे सरपंच आनंदा पाटील यांनी आगारप्रमुख गुरुनाथ रणे यांचे याबद्दल आभार मानून विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय दूर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.