Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'महादेवी'साठी गडहिंग्लजला उद्या जैन बांधवांचा मोर्चा

शिंदे शिवसेनेचेही निवेदन,'महादेवी'ला परत आणण्याची मागणी




गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील 'महादेवी हत्तीणी'ला परत मठाकडे सुपूर्द करण्याच्या मागणीसाठी उद्या मंगळवार दिनांक ५ रोजी गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील जैन समाजातर्फे गडहिंग्लज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, शिंदे शिवसेनेनेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 'महादेवी हत्तीण' परत देण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या मागणीचे पत्र पाठविले आहे. सदर निवेदन शहर संघटक काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे. 



मुनिश्री १०८ विदेहसागरजी महाराज यांच्या सानिध्यात गिजवणेच्या श्री १००८ चंद्रप्रभ जैन मंदिराच्या पुढाकाराने हा मोर्चा निघणार आहे. पिराजी पेठेतील जैन मंदिरपासून हा मोर्चा निघणार असून गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयावर येणार आहे. येथे निवेदन देण्यात येणार आहे.


 शिंदे शिवसेनेचेही निवेदन 


दरम्यान, शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय संकपाळ, शहर संघटक काशिनाथ गडकरी, युवासेना प्रमुख सुदर्शन बाबर, विलास पाटील शहर प्रमुख सागर कांबळे यांनी देखील महादेवी हत्तीणीला परत आणण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.