Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी मराठी विद्यामंदिर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील तेगनाळे तर उपाध्यक्षपदी नीता गोरे

शालेय व्यवस्थापन समिती निवड खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न




गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील मराठी विद्यामंदिर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील तेगनाळे तर उपाध्यक्षपदी नीता गोरे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, तत्पूर्वी पालक मेळावा पार पाडला.



तेरणी येथे २०२५ ते २०२७ या दोन वर्षाकरीता शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. आनंदी इंगवले, सविता हिरेमठ, प्रशांत संती, सुभाष भोई, संतोष व्ह‌नोळी, स्वप्नजा भोगाणे, सारीका हजेरी, अंजना निंबाळकर यांची सदस्य म्हणून पालकांमधून निवड करण्यात आली. दरम्यान, सुनील तेगनाळे यांची अध्यक्ष व नीता गोरे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. यात अनुक्रमे प्रशांत संती, आनंदी इंगवले यांनी सुचक तर सुभाष भोई, स्वप्नजा भोगाणे यांनी अनुमोदक  होते. पालक मेळावा व अध्यक्ष उपाध्यक्ष निवड अत्यंत शांत व सयंमाने पार पाडल्याबद्ल मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांचे आभार सुनील तेगनाळे यांनी मानले. शालेय कामकाजाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. रमजान अंकली यांनी आभार मानले.




 पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 



शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यापूर्वी शाळेत पालक मेळावा पार पडला. या पालक मेळाव्याला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही सूचना मांडल्या. शिक्षकांनी त्या सूचनांचे समाधानकारक निराकरण केले. उपसरपंच सौ. अंजना निंबाळकर यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य ग्रामपंचायतमार्फत केले जाईल असे आश्वासन दिले. या पालक मेळाव्यात पालक व शिक्षकांमध्ये चांगल्या पद्धतीने सुसंवाद घडून आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.