आजरा(हसन तकीलदार): महावितरणतर्फे तालुक्यात सर्वत्र ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांना विविध योजनांची माहिती देणे आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे काम या मेळाव्यातून होत आहे. या मेळाव्यांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. त्यानुसार महावीतरणतर्फे या मेळाव्यांची व्याप्ती शाखा कार्यालयापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे आजरा तालुक्यात विविध ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
महावीतरण तर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत शाखा कार्यालयस्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेण्यात येणार असून जर सोमवारी सुट्टी असेल तर मंगळवारी हे मेळावे होतील असे सांगण्यात येत आहे. महावितरणाच्या आजरा शाखेतर्फे आजरा तालुक्यातील आजरा येथील तहसील कार्यालयासमोर, हत्तीवडे, आरदाळ, बहिरेवाडी या ठिकाणी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्राहकांना नवीन विद्युत पुरवठा देणे, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा होण्यासाठी कुसुम -बी योजना व मागेल त्याला सौर कृषीपंप योजना माहिती, स्मार्ट मीटर बाबत जनजागृती, शेतीपंप ग्राहकांचे भार कमी करणे वाढविणे यांचे ऑनलाईन अर्ज जागेवर कार्यवाही करणेत आली. त्याचप्रमाणे मेळाव्यात ग्राहकांच्या विविध तक्रारिंचे निराकरण करण्यात आले.मेळाव्याबाबत ग्राहकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी उपकार्यकारी अभियंता दयानंद अष्टेकर, कृष्णात कोळी (शाखाधिकारी आजरा 1), संतोष डोंगरे, सुनील पाटील, विनोद कांबळे, दीपक जमने (शाखाधीकारी आजरा 2),बाळकृष्ण कडुकर, प्रथमेश कातकर, रोहित शेंडे, संभाजी खंडे, सुशांत शिवणे (शाखाधिकारी आजरा 3),तेजस पाटील, संदेश लोहार, प्रदीप हुंदळेकर, रवींद्र रेडेकर (शाखाधिकारी उत्तूर 1), महेश कोरे,निखिल काळोजी (शाखाधिकारी उत्तूर 2),महादेव पाटील, नीता गायकवाड, सुनील भाटले, श्रावण कांबळे, इम्रान हवालदार आदिजण अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतला.

