गडहिंग्लज (प्रतिनिधी): औरनाळ येथील पार्वती हायस्कूलमध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट, बेडकीहाळ येथील मुख्य अभियंता किशोर पाटील तर अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळ गडहिंग्लजचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक उमेश सावंत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व इयत्ता 10 वी च्या निकालाचे विश्लेषण व वर्षभरातील कामाचा आढावा विभाग प्रमुख जी.आर. पाटील सर यांनी घेतला. यावेळी किशोर पाटील, एस.एन. तांबे, एस.बी. अनावरे, यू.पी. सावंत, बी. जी. कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या कु. प्राची संभाजी हिने आपले मनोगत व्यक्त केले. औरनाळ गावचे सरपंच संदीप पाटील यांनी यशस्वी मुलांचे अभिनंदन केले. प्रमुख पाहुणे किशोर पाटील यांनी मुलांना ध्येयप्राप्तीसाठी कष्टाची आवश्यकता व सातत्य आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सतीश घाळी यांनी गुणवंत यशवंत विद्यार्थ्याचे कौतुक करून अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंदअण्णा कित्तुरकर, औरनाळ गावाचे सरपंच संदीप पाटील, गोकुळचे माजी संचालक बाळासाहेब पाटील औरनाळचे ईश्वर मोरे, आप्पासो बागी, भिमराव कोकाटे, शिवाजी सावंत, आसो भोसले, किशोर कांबळे, सौ ललिता भोसले, अनिल कोरे, लीलाताई तोडकर तसेच मुख्याध्यापक प्राचार्य एस.एन. तांबे, एस.बी. अनावरे सर, श्री.बी.जी. कुंभार, श्री. रक्ताडे, श्री. बागेवाडी, ए.के. कांबळे, डॉ. शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ही. आर. रेपाळ यांनी केले. तर आभार एम.बी. कासार यांनी मानले. या कार्यक्रमाला औरनाळ, शेंद्री, हनिमनाळ गावचे नागरिक व पालक उपस्थित होते.







