Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा आगारात नवीन पाच लालपरी दाखल ; प्रवाशातून समाधान



आजरा (हसन तकीलदार): आजराच्या स्थानिक प्रवासी व विविध संघटनांच्या मागणीनुसार आजरा आगाराला पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून नवीन पाच लालपरी गाड्या आजरा तालुका शिवसेनाप्रमुख संजय पाटील,आजरा शहर शिवसेना प्रमुख विजय थोरवत, अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे, भाजप माजी तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांच्या हस्ते पूजन करून  प्रदान करण्यात आल्या.



यावेळी स्वागतपर भाषणात इंद्रजीत देसाई यांनी सांगितले की, यापूर्वी देखील 2024 ऑक्टोबरच्या दरम्यान हिरकणीच्या दहा गाड्या तसेच एप्रिल 2025 च्या दरम्यान लालपरी च्या पाच गाड्या देण्यात आल्या होत्या. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज पुन्हा पाच गाड्या आजरा आगाराला देण्यात आल्या आहेत. प्रवाशांकडून रूटबाबत अनेक तक्रारी येत असल्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व संघटना तसेच प्रवासी संघटना यांना समाविष्ट करून रूट प्लॅन वरती सविस्तर चर्चा आगार प्रमुखांशी केली जाणार आहे. तसेच भविष्यात अजून आवश्यक गाड्यांची पूर्तता करण्यासाठी पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील यांनी या गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री श्री. आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे देखील आभार मानले. सुधीर कुंभार यांनी देखील प्रवाशांच्या रूट संदर्भात असलेल्या अनेक तक्रारीचे निवाकरण करण्याबाबत सांगितले.



यावेळी नाथाभाऊ देसाई, संतोष भाटले, भाजप तालुकाप्रमुख अनिकेत चराटी आगार प्रमुख प्रवीण पाटील, तंत्र कार्यशाळा उपअभियंता रजपूत साहेब, गौरव देशपांडे, दिनकर जाधव जावेद पठाण, यशवंत चव्हाण, विजय कोंडुस्कर, काका देसाई, दयानंद निऊंगरे, संदीप खवरे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.