Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला पार्श्वगायक किशोर कुमार यांची जयंती साजरी

अमन युथ सर्कल, नगरपरिषद, कला अकादमी यांच्या वतीने आयोजन 


                                                छायाचित्र : मज्जिद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील अमन युथ सर्कल, नगरपरिषद व कला अकादमीच्या वतीने पार्श्वगायक किशोर कुमार यांची जयंती साजरी करण्यात आली.


यानिमित्त संगीत मैफलीच्या आयोजन करण्यात आले होते. किशोर कुमार यांच्या प्रतिमेचे पूजन दीपक कोळकी यांच्या हस्ते करण्यात आले. रफिक पटेल यांनी किशोर कुमार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्वागत युनूस नाईकवाडी यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांनी किशोर कुमार यांना आदरांजली वाहिली.



दिपक कोळकी, राजू भुईम्बर, आत्माराम पाटील, जितेंद्र कांबळे, सतीश सुतार, हबीब मकानदार, सलीम खलिफ, युनूस नाईकवाडे यांनी विविध गीत सादर केले. कार्यक्रमाला रसिका श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध गाण्यांमुळे हा कार्यक्रम बहारदार झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.