गडहिंग्लज ( प्रतिनिधी ): येथील डॉ. घाळी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दूर शिक्षण केंद्रात बी. लिब अँड आयएससी (ग्रंथालय व माहितीशास्त्र शिक्षणक्रम) या एक वर्ष पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात झाली असून, प्रवेश सुरू झाले आहेत.
कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा ५० टक्के गुणांनी उतीर्णतेची अट आहे. गृहिणी, नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. या अभ्यासक्रमामुळे माध्यमिक शाळा, सीबीएसई स्कूल, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालये, अभियांत्रिक कॉलेज ग्रंथालये, शासकीय ग्रंथालये व माहितों केंद्र आदी ठिकाणी ग्रंथपाल म्हणून काम करण्याची संधी मिळते. दर रविवारी या अभ्यासक्रमाच्या तासिका असतील. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी डॉ. घाळी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी केले आहे.

