Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारे शिक्षण हवे : प्राचार्य किशोर म्हेत्री

हलकर्णी भाग ज्युनिअर कॉलेजच्या व्होकेशनल विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): रशिया, जर्मनी, जपान, चीन यासारख्या देशांमध्ये उत्पादन करणाऱ्या उद्योगाला महत्व दिले जाते असल्यामुळे ते देश आज प्रगतीपथावर आहेत. उत्पादन करणारे उद्योग व सेवा उद्योग यामध्ये सध्या सेवा उद्योगाचे वर्चस्व असल्याने आर्थिक व्यवस्था मोजक्याच उद्योगपतींकडे आहे. या सर्व बाबींचा विचार करता आज विद्यार्थ्यांना श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या शिक्षणाची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य किशोर म्हेत्री यांनी केले.



हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्यवसाय शिक्षण विभागामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य म्हेत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य राजीव पाटील होते. प्रास्ताविक विभाग प्रमुख विकास पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. संगीता पोतदार यांनी करून दिले. यावेळी प्राचार्य राजीव पाटील यांनी मुलांनी व्यवसाय शिक्षण विभागाकडे प्रवेश घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत मोबाईलचा वापर चांगल्या कामाकरिता करून आपल्या शैक्षणिक ज्ञानामध्ये भर पाडावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी इयत्ता बारावीचे विद्यार्थी रोहन कदम, मयुरी शेरवी, नम्रता शिरहट्टी, अजय लोहार, अपूर्वा गुरव, श्रीकृष्ण व्हसकोटी, अकरावीचे विद्यार्थी आचल मगदूम, सुजल केसरकर, यश चौगुले, प्रथमेश राजापूरकर यांनी मनोगते व्यक्त केली. राजाभाऊ सासणे, रामदास रणदिवे यांनी मार्गदर्शन केले.



या कार्यक्रमास अविनाश कुराडे, चंद्रकांत भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा गवाणी यांनी केले. आभार प्रा. प्रकाश इंगळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.