गडहिंग्लजला विद्या प्रसारक मंडळातर्फे सेवानिवृत्तांचा सपत्नीक सन्मान
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : निवृत्ती म्हणजे थांबणे नव्हे, तर नव्या उमेदीने जगण्याची सुरुवात आहे. रिटायर न होता रिचार्ज होऊन आनंदी जीवन जगावे. जीवनात बोलण्यावर व खाण्यावर नियंत्रण ठेवल्यास आयुष्य अधिक सुंदर होते. शिक्षकेपेक्षा हा खरोखरच भाग्यवान पेशा असून सतत कृतिशील राहणे हेच जीवनाचे खरे बळ असते असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षक नेते, को.जि.मा.शि. पतसंस्थेचे तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी केले.
गडहिंग्लज येथे विद्या प्रसारक मंडळ आयोजित विजयकुमार चौगुले, मनोहर गुलगुंजी, प्रा. किरण वाघमोडे, एम. एस. बोजगर व सदानंद लोखंडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश घाळी होते.
स्वागत व प्रास्ताविक सहसचिव गजेंद्र बंदी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्वाती क्षीरसागर यांनी करून दिला. सेवानिवृत्तांचा सपत्नीक सत्कार दादासाहेब लाड, डॉ. सतीश घाळी, अरविंद कितुरकर, ॲड. बी.जी. भोसकी, ॲड. विकासराव पाटील यांच्या शुभहस्ते झाला.
डॉ. सतीश घाळी म्हणाले, संस्कार, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांनी पुढाकार घेऊन सर्वसामान्य बहुजनांच्या मुलांच्यासाठी चांगली सेवा दिलात. घरी न बसता कृतिशील राहा. चिंताग्रस्त होऊ नका. ही सगळी मंडळी संस्थेची नाळ जोडणारी आहेत याचा रास्त अभिमान आहे. विजयकुमार चौगुले, मनोहर गुलगुंजी, एम. एस. बोजगर, सो. वाघमोडे, कुमारी मीना लोखंडे यांनी सत्काराला उत्तर देऊन कृतज्ञता व्यक्त केली. को.जि.मा.शि.पतसंस्थेचे नूतन चेअरमन सचिन शिंदे यांचाही विशेष सत्कार डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पुजारी, सौ.गिता पाटील यांनी तर आभार बी.जी.भोसकी यांनी मानले. यावेळी किशोर हंजी, सचिन शिंदे, रफिक पटेल, प्राचार्य दत्ता पाटील, श्रीरंग तांबे, उमेश सावंत, शिवाजी अनावरे, श्रीमती माला आजरी, सौ, सुनीता पाटील, बी.जी. कुंभार, तमान्ना पाटील, राजेंद्र गड्ड्यानावर, राकेश पाटील, राजेंद्र खराटे, ए.के.कांबळे, महावीर मरजे, संजय देसाई यांच्यासह सर्व आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




