आजरा : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ध्वजारोहण मुख्याध्यापक एस. आर. मुंढे यांच्या हस्ते पार पडले.
त्यानंतर गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली व ग्रामपंचायतीत ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. यावेळी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ पार पडला. तसेच ‘निपुण भारत’ अंतर्गत असाक्षर प्रौढ विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. हेळवे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात श्री. मुंढे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि देशभक्ती याबाबत मार्गदर्शन केले. समूह गीताने व प्रभावी भाषणे करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर दावणे यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन सादीक हावळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ. के. आर. जाधव, एस. एस. कांबळे, यांच्यासह सर्व शिक्षकव विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील विविध मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

