श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्य उपक्रम
आजरा (प्रतिनिधी): श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्य करंबळी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून पायी दिंडीचे प्रस्थान झाले. यामध्ये करंबळी व पंचक्रोशी भागातील वारकरी संप्रदाय, रामतीर्थ गाथा पारायण, महादेव भक्त व राम भक्तांनी सहभाग घेतला होता. त्याचे औचित्य साधुन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मार्फत ह.भ.प. श्री गुरु स्वामी योगी महाराज, तमनाकवाडा आश्रम (ता-कागल) यांच्या हस्ते तिर्थक्षेत्र रामतीर्थ येथील महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत यावेळी सर्वांनी व्यक्त केले.
यावेळी सचिन पन्हाळकर, एम.डी पाटील, सुभाष कांबळे, बाळासाो शेरेकर, प्रकाश पाटील तसेच वारकरी व भक्त उपस्थित होते.



