Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील हलकर्णी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेक्रेटरी आर. जी. पाटील उपस्थित होते. 


सकाळी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रगीत व ध्वजगीताने वातावरण देशभक्तीमय झाले. प्रास्ताविक हर्षदा तांबडे यांनी केले. बीए भाग 1 च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कविता, भाषणे व समूहगीते सादर केले.



या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा परिधान करून देशभक्तीचा संदेश दिला. यावेळी आर. जी. पाटील यांनी आपल्या भाषणातून देशसेवेचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर म्हैत्री यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख बिस्मिल्ला मुल्ला यांनी केले. प्रा. कुराडे यांनी आभार मानले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.