स्वातंत्र्यदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा 'सरपंच अवॉर्ड' ने गौरव
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिले 'विम्याचे कवच'
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील बुगडीकट्टी येथील ग्रामपंचायतीने सरपंच दयानंद देसाई संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सरपंच अवॉर्ड देऊन गौरविण्यात आला. या ग्रामपंचायतीचा आदर्श तालुक्याने घेण्यासारखा आहे.
प्रारंभी सरपंच दयानंद देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्या मंदिर बुगडीकट्टी शाळेला आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या शाळेचे मुख्याध्यापक अशोक गडदराम व शिक्षक करवीर गोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे अध्यापक दत्तात्रय पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श आरोग्य सेवक शिवानंद चिनगुडे, आदर्श कराटे कोच प्रीती गिडमणी, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, जयश्री लोहार, बचत गट गोकुळ महिला बचत गट, आदर्श वायरमन दशरथ तेरणी, आदर्श अंगणवाडी सेविका सुरेखा घस्ती, आदर्श अंगणवाडी मदतनीस संगीता हरकर, आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी सृष्टी जोडगुद्री, सानिका देसाई, यश वंटमुरी, सारिका हेब्बाळे, आदर्श कबड्डी संघ महालक्ष्मी कबड्डी संघ, आदर्श आशा वर्कर अलका हिरामणी, आदर्श डाटा ऑपरेटर सुरेश बाळकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सरिता हेब्बाळे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कर्मचारी विलास रामाज, वसंत हगवणे, सुरेश बाळकर, विलास कांबळे यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघाती व आरोग्य विमा संरक्षण कवच देण्यात आले. दरम्यान, सरपंच दयानंद देसाई यांनी कै. नानासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ दहा हजार रुपये विद्या मंदिर बुगडीकट्टी शाळेला ठेव स्वरूपात दिली. या ठेवीच्या व्याजातून दरवर्षी गुणवंत मुलांना बक्षीस देण्यात यावेत असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सरपंच दयानंद देसाई, उपसरपंच मायाप्पा धनगर, सदस्य जोतिबा हुबळे, रामा हुदली, मंगल देसाई, गौरा राजगोळे, ग्रामसेवक सुजाता पाटील, महसूल अधिकारी मल्लिकार्जुन कळसगोंडा, आरोग्य सेविका रिया साळुंखे, शिवानंद चिनगुडे, वसंत नाईक, रुद्राप्पा देसाई, विठ्ठल राजगोळे, अशोक पाटील, आजी माजी सैनिक संघटना यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.









