Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळवून देण्याचे काम ग्रंथालय करते : संजय थोरात

ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त मुगळी वाचनालयात कार्यक्रम





गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर रंगनाथन यांनी ग्रंथालयसाठी पाच सूत्रे दिले आहेत. त्यामधील एक सूत्र म्हणजे प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. ते काम मुगळी येथील महात्मा गांधी ग्रंथालय करत आहे, असे मत मराठी कवी लेखक संघटना कोल्हापूरचे संघटक संजय थोरात यांनी व्यक्त केले.



ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त नियोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाटील होते. श्री.  थोरात पुढे म्हणाले, ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणजे एस आर रंगनाथन  होय. ग्रंथालयाचा पाया त्यांनी घातला. ते गणिताचे प्राध्यापक असताना ती नोकरी सोडून मद्रास येथे त्यांनी ग्रंथपाल नोकरी केली. यावेळी त्यांनी ग्रंथालय शास्त्राचे पाच सिद्धांत लिहिले. ग्रंथ वाचकांसाठी झाले पाहिजे, ग्रंथाला वाचक मिळाला पाहिजे, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, वाचकाचा वेळ वाचला पाहिजे यांचा त्यात समवेश आहे. विद्यार्थ्यांनी दररोज वर्तमानपत्रांचे वाचन केले पाहिजे.  बुके देण्यापेक्षा पुस्तक देऊन वाढदिवस साजरा केला पाहिजे.



विद्यार्थ्याने धार्मिक पुस्तकातील श्लोक वाचवेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर खूप वाचन करत होते. त्यामुळे जिथे वाचन असते तिथे चांगले विचार असतात. वाचनाचे प्रकट व मुखवचन असे दोन प्रकार आहेत. त्यामुळे जितका आपण वाचनावर भर देतो तितकी आपली प्रगती होते. आपल्या ज्ञानात भर पडते. असे त्यांनी सांगितले.



स्वागत सचिव आप्पासो जाधव यांनी केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रतिमा पूजन संजय थोरात यांनी केले. राजाराम मोहन रॉय कलकत्ता यांच्याकडून वाचनालयास सुमारे 80 हजार किमतीचे संगणक संच मिळाले असून त्याचे पूजन गडहिंग्लज येथील साने गुरुजी वाचनालयाचे ग्रंथपाल राजु भुईम्बर यांच्या हस्ते करण्यात आले. आदर्श ग्रंथवाचक मयुरी कटकोळे व आदर्श वृत्तपत्र वाचक गुरुप्रसाद धनवडे यांचा सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.



या कार्यक्रमास सुरेश पाटील,  बी जी स्वामी, आप्पासो जाधव, सागर आरबोळे, विजय महाडिक, सुरसेन प्रियदशी, एस एस खडकेकर, ग्रंथपाल के डी धनवडे, लिपिक श्रीपाद स्वामी, राजु मांग, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी, वाचक उपस्थित होते. आभार सागर आरबोळे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.