Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरच्या चार योगापटूंची दुबई येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड



दुर्वांक कोरे, सिद्धेश इंगळे, विशालराज पाटील, गोपालकृष्ण कालेकर यांचा समावेश


कोल्हापूर :  नागपुर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कोल्हापूरच्या चार योगापटूंची दुबई येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये दुर्वांक विवेक कोरे, सिद्धेश मच्छिंद्रनाथ इंगळे, विशालराज बाजीराव पाटील आणि गोपालकृष्ण मधुकर कालेकर यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी २९ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले.



या स्पर्धेत प्रणित संजय पवार, रोशन अमोल भोसले आणि स्मिता अजित अलमान यांनी देखील उत्कृष्ट प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या यशामागे कोल्हापूर जिल्हा योग कल्चर असोसिएशनच्या सचिव डॉ. जयश्री पाटील, डॉ. आर. डी. पाटील ( संचालक, श्रद्धा हाॅस्पिटल ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी अथक परिश्रम घेऊन हे यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे खेळाडू जिल्ह्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.