'ऑरेंज अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय यंत्रणांना आदेश
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट असल्याने सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. नद्यांचे पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिथे जिथे गणपती विसर्जन होणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिली आहे.
विसर्जन ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी.आपल्या अधिनस्त सर्व यंत्रणांना अत्यंत जागरूक राहून कार्यरत ठेवावे. कोणतीही घटना घडल्यास त्वरित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात कळवावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुक्यातील शासकीय यंत्रणा देखील सतर्क असून गावोगावी ग्राम महसूल अधिकाऱ्यांसह इतर यंत्रणा यांनी खबरदारी घेतली आहे.

