नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने आवाहन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांची जयंती दिनांक ७ सप्टेंबर रोजी गावोगावी साजरी करावी असे आवाहन नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष बाळेश नाईक, जिल्हाध्यक्ष शिवानंद घस्ती, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष गणपतराव पट्टणकुडी, उपाध्यक्ष केंप्पाना कतिगार, युवा अध्यक्ष मारुती नाईक, सागर गुंडली, भीमराव पाटील यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नरवीर उमाजी नाईक यांनी दिलेले बलिदान व महत्व याविषयी या जयंतीच्या माध्यमातून सर्वांना पटवून द्यावे. ब्रिटिशांना सळो की पळो करून त्यांच्या सत्तेला हादरा देणारे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांचा इतिहास या माध्यमातून सर्वदूर पोहोचवावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

