चिंचणे येथील सोशल हेल्थ केअर असोसिएशनचे सहकार्य
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नविन वसाहत दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे गणेश चतुर्थी निमित शिवप्रेमी तरुण मंडळाच्या वतीने व सोशल हेल्थ केअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चिंचणे (ता- चंदगड) या सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराला ग्रामस्थांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात २०० हुन अधिक जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये बी.पी, शुगर, ई.सी.जी, डोळे तपासणी, जनरल चेकअप, छातीचे विकार, निमोनिया यासारख्या सर्व आजारांची तपासणी करून आजाराचे निदान , औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरातील रुग्णांची तपासणी सोशल हेल्थ केअर असोसिएशन्सचे मेडिकल यूनिट टीम, एस आर पॅथॉलॉजी दुंडगेचे सोनाली दंडगीदास, कोल्हापूर येथील वैभवलक्ष्मी रक्तपेढी केंद्र व माऊली ऑप्टिकल्स नेसरी यांच्या टीमने केली.
यावेळी सोशल हेल्थकेअर असोसिएशनचे स्वंस्थापक सचिन चिंचणेक, शिवप्रेमी तरुण मंडळाचे स्वंस्थापक अध्यक्ष दुंडापा संकपाळ, अध्यक्ष महादेव नाईक, उपाध्यक्ष प्रसाद खवरे, मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.






