Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली



कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.32 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.


पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, बाजार भोगाव, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, कुंभी नदीवरील- सांगरुळ व कळे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव, कोडोली व खोची, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे, धामणी नदीवरील- सुळे, हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव, ऐनापूर व निलजी, तुळशी नदीवरील- बीड असे एकूण 37 बंधारे पाण्याखाली आहेत. 


जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.32 (99.51 टक्के), तुळशी 2.85 (82 टक्के), वारणा 29.24 (85 टक्के), दूधगंगा 15.97 (63 टक्के), कासारी 2.33 (84 टक्के), कडवी 2.42 (96 टक्के), कुंभी 2.13 (79 टक्के), पाटगाव 2.55 (69 टक्के), चिकोत्रा 0.84 (55 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.14 (92 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (34 टक्के) व कोदे ल.पा. 0.21 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे.


तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 33.8, सुर्वे 32.4, रुई 62, इचलकरंजी 58.5, तेरवाड 51.9, शिरोळ 43.4, नृसिंहवाडी 40.9 तर नजीकच्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे 19.5 फूट इतकी पाणीपातळी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.