Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'तबला' परीक्षेत तालसाधना विद्यालयाचे घवघवीत यश

            कु. प्रज्ञा पोटे                      हर्षवर्धन पाटील 

गडहिंग्लज (संपत सावंत ): अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तबलावादन परीक्षेत शहरातील तालसाधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. हर्षवर्धन पाटील तबला मध्यमा प्रथम परीक्षेत तर कु. प्रज्ञा पोटे तबला प्रवेशिका प्रथम परीक्षेत गडहिंग्लज केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. ओमकार पवार यांनी मध्यम प्रथम मध्ये द्वितीय श्रेणी मिळवली.


प्रवेशिका पूर्णमध्ये गौरव खरात, अभिमन्यू देसाई, श्रीविराज कोपार्डे यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.  प्रवेशिका प्रथममध्ये कौस्तुभ साळगावकर, कु. प्रांजल सावंत, कु. वेदिका सावंत, यश होडगे, शौर्य बागडी, श्रेयस खवरे, अथर्व हुक्केरी, सतेज पाटील यांनी प्रथम श्रेणी मिळविली. प्रारंभिकामध्ये ऋग्वेद जाधव, अद्वैत जाधव, रुद्र घेवडे, कु. राधिका गोडसे, ऋतुराज मोहिते, आरुष शिवूडकर, उत्कर्ष पाटील यांनी द्वितीय श्रेणी तर युवराज नाईक, श्रीहर्ष जाधव यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

यशस्वी विद्यार्थ्यांना संभाजी परीट यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल सर्वांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.