कै. डॉ. एस. एस. घाळी जयंती; बुद्धिबळ स्पर्धेत १९८ स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रेयस पाटील, कु. आदित्यी गाडवी, समर्थ शिंदे, कु. निता धुळाज विजेते
गडहिंग्लज (संपत सावंत) : विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार कै. डॉ.एस. एस. घाळी यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त जागृती हायस्कूल येथे संस्थांतर्गत बालवाडी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात भव्य बुद्धिबळ स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत तब्बल १९८ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन दंतरोग तज्ञ डॉ. शिवानी हत्ती, नेत्ररोग तज्ञ डॉ. दुष्यंत हत्ती, प्रा. संजय हत्ती यांच्या शुभहस्ते बुद्धिबळ पटाचे पूजन, मोहरा चालवून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी होते. स्वागत व प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख संपत सावंत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्पर्धा समन्वयक प्रा. शिवानी पेडणेकर यांनी करून दिला.
खेळाडूंना मार्गदर्शन करताना डॉ. शिवानी हत्ती म्हणाल्या, बुद्धिबळातील प्रत्येक चाल विचारपूर्वक असते त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक निर्णय संयमाने आणि विचारपूर्वक घेतला तर यश निश्चित मिळते. घाईत घेतलेले निर्णय पराभवाकडे तर संयमाने घेतलेले निर्णय यशाच्या दारी घेऊन जातात." अध्यक्षीय मनोगतात गजेंद्र बंदी म्हणाले, बुद्धिबळात जसे प्रत्येक चालीचे नियोजन असते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्याचे योजनाबद्ध नियोजन केल्यास जीवन अधिक यशस्वी, सुखकर आणि आनंदी होईल.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, मुख्याध्यापक उमेश सावंत, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापक अनिल मसाळे यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी पंच म्हणून संपत सावंत, प्रा. शिवानी पेडणेकर, प्रवीण पाटील यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
लहान गट मुले- श्रेयस पाटील, अथर्व स्वामी, अंशुमन आंबी, राजवर्धन गायकवाड( सर्व जागृती) दर्शन धुळाज(मुत्नाळ)
लहान गट- मुली -कु. आदित्यी गाडवी(जागृती), कु. श्रुतिका पाटील (जागृती) ,कु. श्रेया पाटील (जागृती प्राथमिक), कु.तेजल तोडकर (जागृती), कु.अनन्या लाटकर (जागृती)
मोठा गट -मुले- समर्थ शिंदे (जागृती), गौरव बिरंजे (आर.के. ज्युनि), श्रेयस पाटील, अभिजीत बिरंजे, कल्पेश पाटील (सर्व जागृती )
मोठा गट -मुली- कु.निता धुळाज (मुत्नाळ),कु. दीक्षा पाटील (न्यू होरायझन), कु. दीक्षा जाधव, कु. प्रणवी माने, कु. अन्नपूर्णा मगदूम (सर्व आर.के. ज्युनि.)




