Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गुरु म्हणजे व्यक्तिमत्व घडविणारा प्रेरणास्त्रोत : विजया वेसणेकर

जागृती हायस्कूलमध्ये 'गुरुपौर्णिमा' उत्साहात संपन्न




गडहिंग्लज (संपत सावंत) : गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा शिक्षक नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा, मूल्यांची जपणूक आणि जीवनाला आधार देणारा प्रेरणास्त्रोत असतो. गुरुपौर्णिमा हा केवळ उत्सव नसून कृतज्ञता व्यक्त करण्याचा व आत्मपरीक्षणाचा पवित्र दिवस असल्याचे  प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. विजया वेसणेकर यांनी जागृती प्रशालेत पार पडलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंतेश दड्डी होते.



महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक संपत सावंत यांनी केले. कु. सोमेश्वरी फुटाणे व कु. तनुष्का चिकुर्डे यांनी गुरुजनां विषयी कृतज्ञता व्यक्त केली. पुढे बोलताना सौ. वेसणेकर म्हणाल्या," आई- वडील, शिक्षक, मार्गदर्शक,संत हे सर्वच आपल्या जीवनातील खरे गुरु असून त्यांच्यामुळेच जीवन समृद्ध, सुसंस्कृत व यशस्वी बनते. त्यामुळे गुरुजनांविषयी आदर, श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना प्रत्येकाने जपली पाहिजे. अध्यक्षीय मनोगतातून महंतेश दड्डी यांनी 'गुरु हाच खरा ज्ञानाचा दाता ,जीवनाचा शिल्पकार आणि यशाच्या प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ असतो' असे सांगून विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत संस्काराची ही कास धरावी' असे सांगितले.



यावेळी मुख्याध्यापक उमेश सावंत, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, सौ. अरुणा पेडणेकर, अमृत जिल्हा व्यवस्थापक अभिजीत कुलकर्णी, अमृत मित्र शिरीष देशपांडे, विपुल गावित यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना पाटील यांनी तर आभार सौ. गीता पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.