Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील सुदृढ बैलजोडी स्पर्धेत माने, मकानदार, कुराडे, केसरकर यांच्या बैलजोड्या प्रथम



शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने आयोजन

स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ३९ बैलजोड्या सहभागी 

गडहिंग्लज (प्रतिनिधी ): येथील शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने बेंदूर सणानिमित्त गडहिंग्लज येथे घेण्यात आलेल्या सुदृढ बैलजोडी स्पर्धेत बिनधाती गटात महेश माने, अल्ताफ मकानदार (अत्याळ), शिवाजी कुराडे (येणेचवंडी), गुलाबराव केसरकर (बेळगुंदी) यांच्या बैलजोड्यांनी प्रथम क्रमांक पटकावले. 



या स्पर्धा बिन दाती, दाती, चार-सहा, आणि बैलजोडी अशा चार गटात पार पडल्या. एकूण ३९ बैल जोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्या बैलजोड्यांच्या  मालकांना माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. स्वाती कोरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.



 या स्पर्धेचा सविस्तर निकाल असा -


बिन दाती गट :   महेश भैरू माने (अत्याळ),  मोहित भैरू डोमणे (गडहिंग्लज), बाळासाहेब पांडुरंग डोमणे (गडहिंग्लज),  हरीश आप्पासाहेब म्हेत्री (गडहिंग्लज) 


दोन दाती गट:  अल्ताफ गुलाब मकानदार (अत्याळ), शामराव दत्तात्रय राजाराम (जखेवाडी), अश्विनी अमोल पाटील (गडहिंग्लज),  शिवराज बसप्पा कंकणवाडी (गडहिंग्लज ), 


चार ते सहा दाती गट:  शिवाजी केदारी कुराडे (येणेचवंडी),  विशाल आप्पासाहेब कानडे (बेळगुंदी),  वैभव संजय पाटील (गडहिंग्लज),  गुरु सागर पाटील (गडहिंग्लज)


बैलजोडी गट : गुलाबराव मारुतीराव केसरकर (बेळगुंदी),  संतोष रामकृष्ण मगदूम ( बेळगुंदी ), अशोक विरपाक्ष खवणे (नूल ), इकबाल महमदहुसेन काझी (गडहिंग्लज )




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.